जालना: येथील मधील वळण रस्त्यावर असलेली विहीर काळ ठरली आहे. या विहिरीत आज पहाटे आणखी एक कार कोसळली असून त्यात मायलेकीचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत दीड वर्षाची चिमुकली सुदैवाने बचावली आहे. आईने प्रसंगावधान बाळगत या चिमुकलीला कारच्या खिडकीतून बाहेर फेकले. त्यामुळे आईचा मृत्यू झाला असला तरी चिमुकली बचावली आहे. तिच्यासह तीन जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ( )

वाचा:

अपघातग्रस्त कारमधील सर्व प्रवासी वाशिम जिल्ह्यातील मनोरा तालुक्यातील सिंगडोह गावातील आहेत. आज सकाळी पाच वाजेच्या सुमारास येथून जालना मार्गे वाशिमकडे जाण्यासाठी हे कुटुंब कारमधून निघाले होते. चालकाचा ताबा सुटल्यामुळे त्यांची कार जामवाडी येथे जालना ते देऊळगाव राजा मार्गावरील विहिरीत कोसळली. कार वेगाने विहिरीच्या दिशेने जात असल्याचे लक्षात येताच महिलेने खिडकीतून दीड वर्षाच्या चिमुकलीला बाहेर फेकले. त्यामुळे ती बचावली आहे. या चिमुकलीचे नाव असे आहे.

वाचा:

कार विहिरीत कोसळल्यानंतर कार चालक गोपाल विठ्ठल फांदडे (वय ४०) आणि जय गुणवंत वानखेडे (वय १७) हे दोघेजण पोहून वर आले. विहिरीतून वर आल्यानंतर त्यांनी मदतीसाठी गावकऱ्यांना साद घातली. त्यानंतर तिथे मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले तसेच काही वेळातच पोलीसही घटनास्थळी पोहचले. ग्रामस्थ आणि पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून तब्बल तीन तासांनंतर कार विहिरीतून बाहेर काढली. मात्र, कारमध्ये अडकलेल्या (वय ३५) आणि मुलगी माही गोपाल फांदडे (वय ५) या वाचू शकल्या नाही. त्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयात पाठवले. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले असून तिघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वाचा:

दरम्यान, जामवाडी येथे रस्त्याला लागूनच ही विहीर आहे. वाहनचालकांसाठी ही विहीर काळ ठरली आहे. या वाहिरीत लागोपाठ अशाप्रकारच्या दोन दुर्घटना घडल्या आहेत. शुक्रवारी रात्री याच विहिरीत कार कोसळून शेख अब्दुल मन्नान आणि अझर कुरेशा या दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र भावना व्यक्त केल्या असून येथील अपघात रोखण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here