वाचा:
वडोदरा येथे पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. येत्या २१ फेब्रुवारी रोजी येथे मतदान होणार आहे. त्यामुळे सध्या जोरात प्रचार सुरू आहे. आज विजय रुपाणी यांच्या शहरात तीन जाहीर सभा होत्या. शहरातील तरसाली आणि कर्लीबाग येथील सभा आटोपून ते निजामपुरातील मेहसणानगर येथील सभेला पोहचले होते. तिथे अन्य वक्त्यांची भाषणे झाल्यावर रुपाणी हे भाषणासाठी उभे राहिले. दरम्यान, भाषण करत असतानाच रुपाणी यांना भोवळ आली. हे पाहून त्यांच्या बाजूलाच असलेल्या त्यांच्या अंगरक्षकाने त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र रुपाणी खाली कोसळले. या प्रकाराने सगळेच हादरले. स्टेजवर अन्य नेतेही धावले. काही वेळातच रुपाणी सावरले व चालतच स्टेजवरून खाली उतरले.
वाचा:
विजय रुपाणी यांनी नंतर आपल्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे. ‘माझी तब्येत आता उत्तम आहे. कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही. डॉक्टरांनी माझी तपासणी केली आहे. व्यस्त कार्यक्रमांमुळे थकवा येऊन हा प्रकार घडला असावा असे त्यांचे म्हणणे आहे. तरीही मी पुढील तपासण्या करून घेणार आहे’, असे रुपाणी यांनी नमूद केले. उपमुख्यमंत्री यांनीही रुपाणी यांची तब्येत आता चांगली असल्याचे सांगितले. माझे मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे. थकव्यामुळे हा प्रकार घडला आहे. दुसरे काही नाही, असे पटेल यांनी नमूद केले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times