वाचा:
अपघातग्रस्त ट्रक धुळे जिल्ह्यातील नेर येथून चोपडा मार्गे रावेरला जात होता. मध्यरात्रीच्या किनगाव येथे अचानक ट्रक उलटला. त्यात १५ जण जागीच ठार झाले तर काही जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश असून हे सगळे रावेर, आभोडा, केऱ्हाळा, विवरा येथील आहेत. जखमींना जळगाव सामान्य रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ट्रकमध्ये एकूण २१ मजूर असल्याची माहिती आहे.
मृतांची नावे पुढीलप्रमाणे:
शेख हुसेन शेख (वय ३० रा. फकीरवाडा, रावेर), सरफराज कासम तडवी (वय ३२, केऱ्हाळा), नरेंद्र वामन वाघ (२५, रा. आभोडा), दिगंबर माधव सपकाळे (५५, रा. रावेर), दिलदार हुसेन तडवी (२०, आभोडा), संदीप युवराज भालेराव (२५, रा. विवरा), अशोक जगन वाघ (४०, रा. आभोडा), दुर्गाबाई संदीप भालेराव (२०, रा. आभोडा), गणेश रमेश मोरे (५, रा. आभोडा), शारदा रमेश मोरे (१५, रा. आभोडा), सागर अशोक वाघ (०३, रा. आभोडा), संगीता अशोक वाघ (३५, रा. आभोडा), सुमनबाई शालीक इंगळे (४५, रा. आभोडा), कमलाबाई रमेश मोरे (४५, रा. आभोडा), सबनुर हुसेन तडवी (५३, रा. आभोडा)
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times