म. टा. प्रतिनिधी, ठाणे

महापालिकेमध्ये सत्ताधारी आणि काही अधिकाऱ्यांच्या साटेलोट्यामुळे दिव्यात वेगाने सुरू आहेत. अवघ्या तीन महिन्यांत चार मजल्यांच्या इमारती उभारल्या जात आहेत, असा आरोप आमदार यांनी केला आहे. या परिसराला किमान नागरी सुविधा पुरविण्यात सत्ताधारी अपयशी ठरले असल्याचेही त्यांनी सांगितले.

परिसरात मोठ्या प्रमाणावर होणारी अनधिकृत बांधकामे आणि नागरी सुविधांची शनिवारी निरंजन डावखरे यांनी पाहणी केली. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी भाजपचे ठाणे महापालिकेतील गटनेते संजय वाघुले, नगरसेवक कृष्णा पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. दिवा परिसरातील अनधिकृत बांधकामांना महापालिकेतील सत्ताधारी आणि काही अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम असलेल्या या इमारतींमधून दिवावासियांना अंधारात ढकलले जात आहे. त्याकडे सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे महापालिका प्रशासनाकडून डोळेझाक केली जात आहे, असा आरोप करत, या संदर्भात विधीमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे डावखरे यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. दिवा परिसरातील नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यात सत्ताधारी आणि महापालिकेला अपयश आले आहे. आठ-आठ दिवस पाणीपुरवठा होत नाही. अनेकदा अवघा तास-दीड तास पाणीपुरवठा होतो. रस्त्यांची स्थिती बिकट आहे. या परिस्थितीला केवळ सत्ताधारी जबाबदार आहेत, असाही त्यांनी आरोप केला.

दिव्यातील अनधिकृत बांधकामांना भाजप कधीही पाठिंबा देणार नाही, असेही डावखरे यांनी स्पष्ट केले. या भागातील अनधिकृत बांधकामांबद्दल आवाज उठविल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना राजकीय आणि न्यायालयीन प्रक्रियेत अडकविण्याचा प्रयत्न सातत्याने सत्ताधारी करीत आहेत. मात्र, भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हा लोकहितासाठी लोकांबरोबर ताकदीने उभा राहिल, अशी ग्वाही डावखरे यांनी दिली. शिळफाटा येथील लकी कंपाऊंडची दुर्घटना आपण विसरलेलो नाही. पण आता दिवा परिसरात अवघ्या तीन महिन्यांत इमारती उभारल्या जातात. या इमारतीत राहणाऱ्या गरीब लोकांचा जीव धोक्यात टाकण्याचे काम सत्ताधाऱ्यांबरोबर संबंधित बिल्डर करीत आहेत. पुन्हा लकी कंपाऊंड सारखी दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोण घेणार? असा सवालही डावखरे यांनी उपस्थित केला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here