म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महापालिकेच्या आयटी विभागातील कर्मचारी आणि कंत्राटदारांच्या संगनमताने निविदा प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याची लेखी तक्रार राजेश शर्मा नावाच्या वकिलाने पालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. त्यावर आयुक्तांनी चौकशी सुरू केली असल्याचा दावा विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

वाचा:

राजेश शर्मा या स्वतःला वकील म्हणणवणाऱ्या व्यक्तीने आयुक्तांना, तसेच सर्व गटनेत्यांना १७ पानांचे लेखी पत्र पाठवले असून, त्यात गेल्या तीन वर्षांतील २५०हून अधिक झाल्याचा आरोप केला आहे. काही कंपन्यांचे मालक, कंत्राटदार हे पालिकेची ‘सॅप’ यंत्रणा हाताळणाऱ्या आयटी विभागातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कंत्राट कामांमधील निविदेतील बोली जाणून घेतात. ती माहिती दुसऱ्या कंत्राटदाराला देऊन त्याप्रमाणे कमी बोली लावून निविदा भरून कामे मिळवत आहेत, असा धक्कादायक प्रकार या पत्रात नमूद केला आहे.

वाचा:

सर्वात जास्त रकमेची निविदा भरणाऱ्या कंत्राटदारांनाच कशाप्रकारे कामे लागली आहेत, याचीही जंत्री पत्रासोबत सादर केली आहे. कंत्राटदार कंपन्यांच्या निविदा पद्धतीची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच ठराविक कंपन्यांना कशाप्रकारे कामे मिळत याची माहिती या पत्रातून देण्यात आली आहे. दरम्यान, पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आपल्यालाही, असे पत्र आले असून, अशा प्रकारे कंत्राटांमध्ये हस्तक्षेप केला जात असल्याचा आरोप केला आहे.

मोठे रॅकेट हाती लागेल

याप्रकरणी आपण पालिका आयुक्तांकडे या भ्रष्टाचाराचे फोरेन्सिक विभागामार्फत ऑडिट करण्याची मागणी केली आहे, अशी माहिती दिली. पालिकेत अनेक वर्षांपासून कंत्राटदार आणि आयटी विभागातील कर्मचाऱ्यांचे रॅकेट आहे. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त अजय मेहता यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. मेहता पालिकेतून गेल्यानंतर ही चौकशी थंडावली आहे. आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी या प्रकरणाची नव्याने चौकशी करावी, यातून मोठे रॅकेट हाती लागेल, असे राजा यांनी सांगितले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here