मुंबईः सोशल मीडियास्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. पूजाच्या आत्महत्येला ठाकरे सरकारमधील एक मंत्री जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. यानंतर भाजप आमदार यांनीही एक ट्वीट करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर कथित ऑडिओ क्लिप सध्या चर्चेत आहेत. यात ठाकरे सरकारमधील मंत्री यांच्यावर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी नाव घेऊन आरोप केला आहे. यानंतर नितेश राणे यांनीही संजय राठोड यांच्यावर थेट आरोप केला आहे. तसंच, राज्याचे पर्यावरण मंत्री यांच्यावरही निशाणा साधला आहे. सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियानच्या आत्महत्येवरुन आदित्य ठाकरे यांना घेरलं आहे.

वाचाः

नितेश राणे यांनी एक ट्वीट केलं आहे. या महाविकास आघाडी सरकारची दूरदृष्टीला सलाम. यांना माहित होते. पर्यावरमंत्र्यांची ‘दिशा’ चुकली मग आता वनमंत्री ‘पूजा’ घालण्याच्या लायकीचे राहिले नाहीत. बाकी मंत्र्यांचे पण ‘कहानी घर घर की’ चालू आहे. म्हणूनचजेल पर्यटन चालु केले असावे, असा खोचक टोला नितेश राणेंनी लगावला आहे.

वाचाः

काय आहे संपूर्ण प्रकरण?

बीड जिल्ह्यातील परळी या गावची असलेली काही दिवसांपूर्वी इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी पुण्यात आली होती. भाऊ आणि मित्रासोबत ती वानवडी येथील हेवन पार्क सोसायटीत राहत होती. सोमवार, ८ फेब्रुवारी रोजी तिनं इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर काही दिवसांतच या प्रकरणाशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याचे आरोप झाले. मात्र, पूजानं मानसिक तणावातून व आर्थिक तणावातून आत्महत्या केल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here