मुंबईः मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (MMRDA) आयुक्त आर. ए. राजीव यांना सक्तवसुली संचलनालयाने समन्स बजावले आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांच्या नावे असलेल्या टॉप्स सिक्युरिटी प्रकरणात राजीव यांना समन्स बजावण्यात आले आहेत.

टॉप सिक्युरिटी या खासगी सुरक्षा रक्षक संस्थेला कंत्राट देताना गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. या कंपनीच्या संचालकांनी परदेशी रक्कमेचा घोटाळा केल्यानं त्या सबंधितांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरु आहे. त्या अंतर्गतच आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचे पुत्र विहंग यांचीही ईडीने चौकशी केली आहे. आता एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांनाही ईडीसमोर हजर राहावे लागणार आहे.

वाचाः

ईडीकडून एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांना आज ईडीनं समन्स बजावले असून त्यांना ईडीनं चौकशीसाठी बोलवले आहेत. त्यामुळं आता ईडी त्यांची काय चौकशी करणार व ते काय उत्तर देताहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच, राजीव यांच्या चौकशीमुळं ईडीला काय महत्त्वाचे धागेदोरे सापडताहेत हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

वाचाः

दरम्यान, काही दिवसांपूर्वी टॉप सिक्युरिटी घोटाळ्याप्रकरणी राज कपूर यांचा नातू व बॉलिवूड अभिनेता अरमान जैन याला देखील समन्स बजावले आहेत. अरमान जैन आणि विहंग सरनाईक यांचे एकमेकांशी संबंध असल्याचा ईडीचा संशय आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here