मुंबईः आत्महत्या प्रकरणावरुन राज्यात वादळ उठलं आहे. विरोधकांनी याप्रकरणी ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात भाजपनं थेट ठाकरे सरकारमधील मंत्र्याचं नाव घेतलं आहे. भाजपनं सातत्याने हा मुद्दा उचलून धरला असतानाच भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांना धमकीचे फोन येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर कथित ऑडिओ क्लिप सध्या चर्चेत आहेत. यात ठाकरे सरकारमधील मंत्री यांच्यावर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी नाव घेऊन आरोप केला आहे होता. त्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीही हा मुद्दा उचलून धरला असून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असं पत्रही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलं होतं. त्यानंतर त्यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे.

वाचाः

‘पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत आवाज उठवल्यामुळं मला काल पासून धमक्यांचे फोन येतायत,’ असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसंच, ‘ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे. धमक्यांना बधणारा मी नाही हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावे,’ असा इशाराही त्यांनी दिला आहे.

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही त्यांना धमक्यांचे फोन येत असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी एक ट्वीट केलं आहे. ‘धमक्यांना घाबरणारी चित्रा वाघ अजिबात नाही त्यामुळे उगा मला फोनकरून वेळ वाया घालवू नका माझ्या भावड्यांनो. जिथे जिथे महिलांवर अन्याय अत्याचार होणार तिथे तिथे नडणार आणि भिडणारचं,’ असं वाघ यांनी म्हटलं आहे.

वाचाः

दरम्यान, पूजाबाबत उलटसुलट चर्चा सोशल मीडियावर होऊ लागल्या आहेत. त्यावर पूजाचे वडिल लहू चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कृपा करून आमची आणखी बदनामी करू नका. आमचे अर्धे कपडे काढलेच आहात. आता उरलेले कपडे तरी काढू नका. नाहीतर मलाही आत्महत्येचा मार्ग निवडावा लागेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here