मुंबई: विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांचं आणखी एक गाणं प्रदर्शित झालं आहे. व्हॅलेंटाइन दिनाच्या निमित्तानं प्रदर्शित झालेलं हे एक रोमँटिक गीत असून अमृता यांनी स्वत: या गाण्याचा व्हिडिओ ट्वीट केला आहे. नेटिझन्सनी या गाण्यावरून त्यांची जोरदार खिल्ली उडवली आहे. ( Tweeted Video of Her New Song)

वाचा:

‘रात हसीं ये चाँद हसीं… तू सबसे हसीं मेरे दिलबर… और तुझसे हसीं तेरा प्यार… तू जाने ना, … ये जाम भरे भरे… जरा पीने दो…’ असे या गाण्याचे बोल आहेत. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्तानं अमृता यांनी खास त्यांच्या चाहत्यांसाठी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या रोमँटिक गाण्याचा अनुभव छान होता,’ असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

यांनी व्हॅलेंटाइन डेच्या दोन दिवस आधी एक ट्वीट करत चाहत्यांना नवी भेट देण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार त्यांनी हे गाणं ट्वीट केलं आहे. या गाण्यावरून अमृता फडणवीस यांना जोरदार ट्रोल केलं जात आहे. ‘आज का सबसे गजब व्हिडिओ… लोकांच्या कानांना भावपूर्ण श्रद्धांजली… आता ट्विटर बंद होणार’ अशा प्रतिक्रिया येत आहेत. ‘मामी तुमच्या छंदाचा आम्ही आदर करतो, पण जबरदस्ती तो कोणावर लादू नका…’ असंही काहींनी म्हटलंय. अमृता यांच्या काही चाहत्यांनी मात्र या प्रयत्नाचं स्वागत केलं आहे. काहींनी तर अमृता यांचं कौतुकही केलं आहे.

अमृता फडणवीस यांनी याआधीही अनेक गाणी गायली आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात प्रामुख्यानं त्या गायिका म्हणून पुढं आल्या होत्या. महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते अमृता यांच्या गाण्याचा अल्बमही यापूर्वी प्रदर्शित झाला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here