मुंबई:
दिल्लीच्या शाहीनबागच्या धर्तीवर मुंबईतली नागपाडा परिसरात महिलांचे , , NPR विरोधात सुरु असलेले आंदोलन मागे घेण्यात आले आहे. सहा दिवसांनी महिलांनी हे आंदोलन मागे घेतले आहे.
दिल्लीच्या शाहीनबागच्या धर्तीवर मुंबईतली नागपाडा परिसरात महिलांचे , , NPR विरोधात सुरु असलेले आंदोलन मागे घेण्यात आले आहे. सहा दिवसांनी महिलांनी हे आंदोलन मागे घेतले आहे.
मदनपुरा, आग्रीपाडा, मुंबई सेंट्रल भागातली महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. सीएए आणि एनआरसी रद्द करावे, या मागणीसाठी रविवार रात्रीपासून या महिला ठिय्या आंदोलन करीत होत्या. त्या महिलांना पाठिंबा देण्यासाठी पुरुषही रस्त्यावर उतरले होते.
दिल्लीतील शाहीन बाग परिसरात सीएए आणि एनआरसी विरोधात महिला आंदोलन करीत आहेत. त्यापासून प्रेरणा घेत, शाहीन बागच्या धर्तीवर महिलांनी सीएए आणि एनआरसी विरोधात मुंबईतील नागपाडा परिसरात आंदोलन सुरू केले. आंदोलनाची तीव्रता पाहून कडेकोट बंदोबस्त या परिसरात ठेवला होता.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times