खेड: रत्नागिरीमधील () (Khed) तालुक्यातील आंबवली वरवली धुपेवाडी येथे तब्बल २७ जणांना करोनाची () लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. करोनाने इतक्या मोठ्या प्रमाणात खेड तालुक्याच्या ग्रामीण भागात शिरकाव केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ आर. बी. शेळके यांनी ही माहिती दिली आहे. (27 corona infected patients were found in a single village in khed)

एका वेळी एकाच गावात इतक्या मोठ्या प्रमाणात करोनाचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली असून या गावात तातडीने सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. येथील करोना आणखी पसरू नये यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क होत उपाययोजना सुरू केल्या आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या मंगळवारी ९ फेब्रुवारी रोजी वरवली धुपेवाडीमधील एक रुग्ण आंबवली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल झाला होता. या रुग्णाचे नमुने तपासले असता त्याला करोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या आणखी ४७ जणांचे नमुन्यांची तपासणी केली असता त्या ४७ पैकी २७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या सर्व रुग्णांना तातडीने कळबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या २७ जणांच्या संपर्कात आलेल्या इतरही लोकांचा शोध घेण्यात येत असून गावातील इतरही लोकांचे स्वॅब गोळा करण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले.

न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय बंद

नमुन्यांची तपासणी केली असतात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी एक रुग्ण न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज आंबवली येथील विद्यार्थी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर १५ ते २० फेब्रुवारी या कालावधीत महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाविद्यालयाने तशी सूचनाही विद्यार्थ्यांना दिली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

वरवली धुपेवाडी या गावातील एकूण लोकसंख्या १५० इतकी आहे. या गावाच्या संपर्कात येणारे भाग ठाणकेश्वरवाडी,सुतारवाडी, देऊळवाडी, गावठाणवाडी , धनगरवाडी या वाड्यांची देखील तपासणी करण्यात येत आहे.

क्लिक करा आणि वाचा-क्लिक करा आणि वाचा-

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here