म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूरः परळी येथील तरुणी आत्महत्या प्रकरणात वनमंत्री यांच्याबाबत नियमानुसार चौकशी होऊन सत्य बाहेर येईल, असे गृहमंत्री यांनी स्पष्ट केले. करोनावर मात केल्यानंतर रुग्णालयातून सुट्टी मिळताच गृहमंत्र्यांनी मीडियाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

या प्रकरणात कुणाच्याही दबावाचा प्रश्न नाही. राठोड यांच्याबाबत नियमानुसार चौकशी होईल आणि जे सत्य समोर होईल. त्यानुसारच पुढील निर्णय घेतला जाईल, असेही देशमुख म्हणाले. चौकशीबाबत मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केले आहे. विरोधी पक्षाच्या आरोपात काही तथ्य नाही, पोलिस खाते व पुणे पोलिस व्यवस्थित तपास करत असून योग्य चौकशी होईल, असा दावाही गृहमंत्र्यांनी केला.
विरोधी पक्षाच्या आरोपात तथ्य नसल्याचा निष्कर्ष काढल्यानंतर चौकशी कशी होणार, या प्रश्नाला बगल देत गृहमंत्री म्हणाले, सद्यस्थितीत राठोड कुठे आहेत हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. तथापि, नियमानुसार चौकशी होऊन सत्य बाहेर येईल.


वाचाः

सेलिब्रिटींची नव्हे भाजपच्या आयटी सेलची चौकशी

कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत सेलिब्रिटींच्या ट्विटवरून चौकशी संदर्भातील वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांची चौकशी करण्याचे वृत्त पूर्णत: चुकीचे आहे. सेलिब्रिटींची नव्हे तर, भाजपच्या आयटी सेलची चौकशी करण्यात येत असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

वाचाः

लता दिदी दैवत आहे. सचिन यांना प्रत्येकजण मानतो. त्यांच्या चौकशीचा प्रश्नच उद्भवत नाही. भाजपच्या आयटी सेलची चौकशी करून, त्यांनी काही स्क्रिप्ट दिली का व इतर महत्त्वपूर्ण बाबींची चौकशी केली आहे. प्राथमिक चौकशीत आयटी सेल प्रमुख व बारा प्रभावकांची नावे समोर आली असून पुढील चौकशी सुरू असल्याचे गृहमंत्री देशमुख म्हणाले.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील बालमृत्यू प्रकरणात गुन्हे दाखल झाले अथवा नाही, याची माहिती घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. माओवाद्यांशी संबंधांवरून अटक झालेला प्रा. साईबाबा करोनाबाधित असल्याने रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारागृहाकडून पूर्ण देखरेख ठेवण्यात येत असल्याचेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here