मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस () आणि भाजप नेत्यांचे शाब्दिक युद्ध सुरूच असून या युद्धात आता भारतीय जनता पक्षाचे ()नेते () यांनी उडी घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष () यांनी सोडलेला बाण अचून वर्मी लागल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष () यांनी इतकी उद्विग्न प्रतिक्रिया दिली. चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्रातून कोणत्याही मतदारसंघातून निवडून येऊ शकतात, मात्र जयंत पाटील यांच्या बॉसला हे अजूनही जमत नाही हेच पाटील जे काही बोलले त्यावरून सिद्ध होत आहे, असे भाजप नेते राम कदम यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पूजा आत्महत्या प्रकरणी गप्प का असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर ज्याला गाव सोडून जावे लागते अशाबाबत मी काय बोलणार?, असा टोला शरद पवार यांनी पाटील यांना लगावला होता. त्यावर जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. याच टीकेला राम कदम यांनी प्रत्युतर दिले.

आम्ही कधीही व्यक्तिगत टिप्पणी करत नाही. चंद्रकांत पाटील हे महाष्ट्रात कुठूनही निवडून येतात हेच जयंत पाटील यांनी आपल्या वक्तव्यावरून महाराष्ट्राला सांगितले आहे. पण जयंत पाटील यांचे सर्वेसर्वा इतर कोणत्याही मतदारसंघामधून निवडणूक लढवण्याची हिंमत करत नाहीत. हे चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य जयंत पाटील यांच्या वर्मी लागलेले दिसत आहे, असे राम कदम यांनी जयंत पाटील यांना टोला लगावताना म्हटले आहे.

राम कदम पुढे म्हणाले की, जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांचे वय काढले. त्यांचे वय कितीही असले तरी त्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता करोनाच्या काळात ते गावागावात फिरले. परंतु तुमचे सर्व मंत्री आणि सरकार मात्र एसी बंगल्यात स्वत:च्या जीवाची चिंता करत होते आणि हे महाराष्ट्र विसरलेला नाही.

क्लिक करा आणि वाचा-

जयंत पाटील नेमके काय म्हणाले होते?

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला आणि स्वत:चा जिल्हा सोडून दुसऱ्याच्या मतदारसंघात जात निवडणूक लढवली. चंद्रकांत पाटील यांनी स्वत:चे बघावे. शरद पवार यांची मापे काढण्याचे काम करू नये, असे वक्तव्य करत जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला होता.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here