आज राज्यात एकूण २३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ४० इतकी होती. आजचा मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता सध्या राज्यातील मृत्यूदर २.४९ टक्के इतका आहे. तसेच राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख ७८ हजार ७०८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५. ७ टक्के इतके झाले आहे.
तसेच राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५३ लाख ५९ हजार ०२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख ६७ हजार ६४३ नमुने पॉझिटिव्ह निघाले आहेत. हे प्रमाण १३.४६ टक्के इतके आहे. सध्या राज्यात १ लाख ७४ हजार ७०४ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर १ हजार ७१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
राज्यातील अॅक्टिव्ह (सक्रिय) रुग्ण
राज्यात आज एकूण ३६ हजार २०१ इतके रुग्ण अॅक्टिव्ह, म्हणजे उपचार घेत आहेत. राज्यातील प्रमुख शहरांचा विचार केल्यास मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४ हजार १२० इतकी असून ठाण्यात ही संख्या ४ हजार ८६२ इतकी आहे. तर पुण्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ हजार ५०३, औरंगाबाद येथे ६३२, नागपूर येथे ४ हजार ४२९, कोल्हापूर येथे १७९, नाशिक येथे १ हजार ९७ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त अॅक्टिव्ह रुग्णसंख्या पुण्यात असून सर्वात कमी रुग्णसंख्या गडचिरोली आहे. येथे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४१ इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times