हरयाणाः केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात ( farm laws ) शेतकऱ्यांचे आंदोलन ( ) सुरू आहे. या आंदोलनाला विरोधी पक्षांचा पाठिंबा आहे. आता हरयाणातील काँग्रेस पक्षाच्या एका महिला नेत्याचा ( ) व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शेतकरी आंदोलनामुळे काँग्रेस ( congress ) पुन्हा उभारी घेईल, असं त्या पदाधिकाऱ्यांना सांगत असल्याचं व्हिडिओत दिसत आहेत.

हरयाणामधील काँग्रेसच्या नेत्या विद्या राणी यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आणि संबंधितांची बैठक घेतली. या बैठकीत विद्या राणी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण संपूर्ण जिंदमध्ये पदयात्रा काढू. शहरापासून ते प्रत्येक गावात ही पदयात्रा काढली जाईल. या पदयात्रेत प्रत्येक गाव जोडलं जाईल. यामुळे आपला एक प्रकारे प्रचार होईल. गेल्या निडणुकीत आपला पराभव झाले आहे. काँग्रेसचं अस्तित्वच संपुष्टात येण्याची भीती आहे. पण शेतकरी आंदोलनाने आपल्या उभारी मिळू शकते. काँग्रेसचा पुनर्जन्म होईल. हे आंदोलन २६ जानेवारील संपणार होतं. पण शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने या आंदोलनाने पुन्हा जोर पकडला. आता हे आंदोलन इतक्या जोरात सुरू आहे की ते आता आपल्याला चालवायचं आहे. शेतकऱ्यांनी आंदोलनासाठी काहीच कमतरता ठेवली नाही. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपापल्या क्षमतेने खाण्या पिण्याची व्यवस्था केली. यामुळे प्रत्येकाने आता या आंदोलनासाठी मदत देऊ केली पाहिजे. पैसे द्या, अन्नधान्य द्या, भाजीपाला द्या, तूप द्या एवढंच काय ते दारू ही देऊ शकता, ज्याला जे योग्य वाटतं त्यांनी ती मदत करावी आणि या शेतकरी आंदोलनाला बळ द्यावं. हे आंदोलन फक्त शेतकऱ्यांचे नाही तर ते सर्वांचे आहे. त्याचा परिणाम आपल्या सर्वांवर होईल, असं काँग्रेस नेत्या विद्या राणी म्हणाल्या. असं वृत्त एएनआयने दिलं आहे. एएनआयने विद्या राणी यांचा व्हिडिओही शेअर केला आहे.

विद्या राणी यांच्या या वक्तव्यावरून मोठा निर्माण झाला आहे. काँग्रेसवर टीका होऊ लागली आहे. आता शेतकरी नेते राकेश टिकैत यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे. शेतकरी आंदोलनाचा दारूशी काय संबंध आहे? त्या असं का बोलत आहेत हे आपल्याला माहित नाही. अशा लोकांचा शेतकरी आंदोलनाशी काहीही संबंध नाही. हे अतिशय चुकीचं आहे आणि असं अजिबात करू नये. त्यांना जे काही द्यायचं आहे ते त्यांनी द्यावं, पण त्यांच्या आंदोलनात ते करावं, असं उत्तर राकेश टिकैत यांनी दिलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here