म. टा. प्रतिनिधी,

विभागाने (GST) कर बुडविणाऱ्यांविरूद्ध कारवाई सुरू केली असून, एका व्यापाऱ्याने सुमारे ११० कोटी रुपयांची देऊन कर बुडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित व्यापाऱ्याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (a in pune smashed by paying of rs 110 crore)

बाबूशा शरणप्पा कसबे असे अटक केलेल्याचे नाव असून, त्याची खुशी ट्रेडर्स नावाची भंगार मालाची कंपनी आहे. कसबे याने बोगस कंपन्यांची सुमारे ११० कोटी रुपयांची बनावट बिले देऊन १६ कोटी ८६ लाख रुपयांचा इनपूट टॅक्स क्रेडिट प्राप्त केला. या प्रकरणी त्यास अटक करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या अन्य बोगस कंपन्यांची माहिती मिळाली असून, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे ‘’ विभागाचे उपायुक्त दत्तात्रय आंबेराव यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-

ही कारवाई सहआयुक्त रेश्मा घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त आंबेराव, सहाय्यक आयुक्त दत्तात्रय तेलंग यांनी केली. जीएसटी विभागाच्या वतीने अॅड. महेश झंवर यांनी बाजू मांडली.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here