दुकानाच्या साइन बोर्ड संदर्भात कारवाई न करण्यासाठी ६० हजाराची (Bribe) घेणाऱ्या पालिकेच्या दोन निरीक्षकांना (Inspectors arrested) अँटी करप्शन ब्युरोच्या () पथकाने अटक केली. नितीन पाटणकर आणि हरिश्चंद्र घेगडमल अशी या दोन निरीक्षकांची नावे असून दोघेही पालिकेच्या मालाड येथील पी उत्तर विभागात कार्यरत आहेत. (two mumbai municipal corporation for accepting )
चारकोप परिसरात राहणाऱ्या व्यावसायिकाचे पालिकेच्या पी उत्तर विभाग कार्यालयाच्या हद्दीत दुकान आहे. या दुकानावरील साइन बोर्ड संदर्भात कारवाईची प्रक्रिया पालिकेच्या वतीने सुरु करण्यात आली होती. ही कारवाई केली जाऊ नये यासाठी व्यावसायिकाने अनुज्ञापन विभागातील निरीक्षक नितीन पाटणकर आणि हरिश्चंद्र घेगडमल यांची भेट घेतली. कारवाई न करण्यासाठी दोघांनी २ लाख २५ हजार रुपयांची मागणी केली. इतकी रक्कम नसल्याने तडजोडीनंतर ६० हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र व्यावसायिकाला पैसे द्यायचे नसल्याने त्याने वरळी येथील अँटी करप्शन ब्युरोच्या कार्यालयात तक्रार केली.
क्लिक करा आणि वाचा-
अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी व्यावसायिकाने केलेल्या तक्रारीची प्राथमिक पडताळणी केली असता यामध्ये तथ्य आढळले. त्यानुसार सापळा लावण्यात आला. पाटणकर आणि घेगडमल यांनी सुदेश पॉल या व्यक्तीला व्यवसायिकाकडून ६० हजार घेण्यास पुढे केले. सुदेश याने रक्कम स्वीकारताच अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने तिघांनाही अटक केली.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times