विज यांनी शेअर केलेल्या स्क्रीन शॉटमध्ये ट्वीटरचा हा मेसेज होता. जर्मन कायद्यानुसार ट्वीटरला ज्या युजर्सने तक्रार केली होती त्यावरून कारवाई केली गेली. तपासात ट्वीट हे नियमांनुसार हटवता येणार नाही, असं ट्वीटरने स्पष्ट केलं. शेतकरी आंदोलनासंबंधी सोशल मीडियावर ‘टूलकिट’शेअर केल्याच्या आरोपावरून बंगळुरु येथून दिशा रवीला अटक करण्यात आली आहे. दिशा ही ‘टूलकिट गूगल डॉक’ ची संपादक आणि दस्तावेज बनवणं आणि ती प्रसारित करणारी मुख्य सूत्रधार आहे, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.
पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत एक टूलकिट शेअर केले होते. भारताविरोधात वेगवगेळ्या स्तरावर विरोध करण्याची योजना मांडण्यात आली होती. जागतिक पातळीवर भारताच्या बदनामीचा हा कट होता, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी कारवाई करत या तरुणीला शनिवारी बेंगळुरू येथून अटक केली. तसंच निकिता जेकब आणि शंतनू यांच्याविरूद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. रविवारी दिशाला दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने तिला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times