मुंबई: एकेकाळी (Panther)अशी ओळख असलेले केंद्रीय सामाजिक न्याय राजयमंत्री () यांनी आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात () पँथर घेतला. प्राणी प्रेम जोपासण्याचा संदेश देण्यासाठी आपण हा (पँथर) दत्तक घेतला असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. यामागे पर्यावरणाच्या रक्षण करणे, तसेच निसर्ग संवर्धन करणे हा देखील उद्देश असल्याचे आठवले म्हणाले.

निसर्गाची साखळी टिकविण्यासाठी बिबळ्या वाघाचे (पँथर) महत्व आहे. माझे नेतृत्व दलित पँथरमधूनच पुढे आले आहे. अमेरिकेत जशी ब्लॅक पँथर, तशी भारतात दलित पँथर ही संघटना कार्यरत होती, असे सांगतानाच दलित पँथरपासून आम्हाला ‘पँथर’बद्दल विशेष प्रेम आहे. त्यामुळेच आम्ही हा पँथर दत्तक घेतला, असे आठवले प्रतिक्रिया देताना म्हणाले.

पँथरचे नाव ठेवले ‘सिंबा’
आठवले यांनी माहिती देताना सांगितले की, या पँथरचे नाव ‘सिंबा’ असे ठेवण्यात आले आहे. आठवले यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सीमाताई आठवले, जित आठवले, बहिण शकुंतला आठवले यांनी देखील बोरिवली नॅशनल पार्कला भेट दिली.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नुकतीच त्यांनी अहमदनगराला भेट दिली. त्यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावर भाष्य केले. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे मागे घेतले जाऊ नयेत. अन्यथा शेतकऱ्यांप्रमाणे इतरही समजातील घटक भविष्यात एखादा कायदा मागे घेण्यासाठी आंदोलन करेल आणि त्यामुळे संविधानच धोक्यात येईल, असे आठवले यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आठवले

पुढील वर्षी मुंबईत होत असलेल्या महापालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरण्याचा संकल्प आठवले यांनी केला आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-आरपीआय अशी लढत होणार असून आरपीआयला उपमहापौरपद मिळेल. त्यासाठी आरपीआयचे उमेदवार निवडून आणणे अत्यंत आवश्यक असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे. त्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश आठवले यांनी मुंबईतील कार्यकर्त्यांना दिले आहेत.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here