वाचा:
मुंबईत सर्वांसाठी प्रवासाची मुभा मिळाल्यानंतर १५-२० दिवसांचा कालावधी निरीक्षणासाठी ठेवण्यात आला आहे. त्यानुसार २२ फेब्रुवारीला आम्ही सर्वंकष आढावा घेणार आहोत. त्यानंतर सामान्यांच्या लोकलप्रवासाबाबत पुढची पावले टाकण्यात येतील, असे काकाणी यांनी स्पष्ट केले. लोकलने मुंबई बाहेरील प्रवासीही मोठ्या संख्येने येजा करतात. त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील अन्य पालिकांची मतेही विचारात घ्यावी लागतील. त्यातून जे मुद्दे समोर येतील ते राज्य शासनापुढे ठेवले जातील, असेही काकाणी यांनी नमूद केले.
वाचा:
लोकल सेवा सर्वांसाठी खुली केल्यानंतर मुंबईत बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याकडे लक्ष वेधले असता, रुग्णवाढीमागे लोकल हे एकमेव कारण नाही, असे काकाणी यांनी सांगितले. हवाई वाहतूक सध्या वाढली आहे. देशांतर्गत सेवांसोबतच आंतरराष्ट्रीय विमानसेवाही सुरू झाल्या आहेत. ही कारणेही लक्षात घ्यावी लागतील, असे काकाणी यांनी नमूद केले. सर्व प्रकारची वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात आल्यानंतर थोडी रुग्णवाढ होणार हे आम्ही गृहितच होते. मात्र, सध्या तरी अपेक्षेपेक्षा कमीच रुग्णवाढ दिसते आहे. पुढील दहा दिवस आपल्याला निरीक्षण करावे लागेल. त्यानंतर नेमके चित्र स्पष्ट होऊ शकेल, असेही काकाणी यांनी नमूद केले. चार राज्यांतून विमानमार्गे मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी आपण करत होतो. त्याजागी आता पाच राज्यांतील प्रवाशांची चाचणी केली जात आहे, असेही काकाणी म्हणाले.
वाचा:
मुंबईत लॉकडाऊन लावण्यावर चर्चा नाही
लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पुढील धोका टाळायचा असेल तर मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग राखणे आणि हात सतत धुणे वा सॅनिटाइज करणे ही त्रिसुत्री आपल्याला कटाक्षाने पाळावी लागेल, असेही काकाणी यांनी सांगितले. मुंबईत लॉकडाऊन लावण्याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times