पाटणा: बिहारमध्ये सोमवारी दोन मोठ्या घटना घडल्या. बिहारमध्ये रात्री ९ वाजून २५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. राज्यातील अनेक जिल्हे या भूकंपाने हादरल्याचं सांगण्यात येतंय. भूकंपामुळे पाटण्यात नागरिक भीतीने घराबाहेर पडले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ३.५ इतकी नोंदवली गेली. या भूकंपाचे केंद्र नालंदामध्ये होतं. दुसरीकडे भाकपचे () नेते ( ) आणि मुख्यमंत्री नितीशकुमार ( ) यांचे मुख्य सहयोगी यांच्यात झालेल्या बैठकीने बिहारमधील राजकीय वर्तुळालाही हादरे बसले.

जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष आणि भाकपचे नेते कन्हैया कुमार यांनी राज्यमंत्री आणि नितीशकुमार यांचे विश्वासू अशोक चौधरी यांची भेट घेतली. बिहार विधानसभेच्या अलिकडेच पार पडलेल्या निवडणुकीत चौधरी हे नितीश यांच्या जेडीयू पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष होते. निवडणुकीनंतर बसपाचे एकमेव आमदार जमा खान आणि गेल्या अपक्ष आमदार सुमित सिंह यांना गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळात विस्तारात स्थान मिळवून देण्यात चौधरी यांची मोठी भूमिका होती.

चिराग पासवान लोक जनशक्ती पक्षाचे एकमेव आमदार राज कुमार सिंह यांना काही आठवड्यांपूर्वी एका पुस्तकाच्या लाँचिंगच्या वेळी चौधरी यांच्या निवासस्थानी बोलावण्यात आलं होतं. कन्हैया कुमार आणि अशोक चौधरी यांच्या भेटीलाही पार्श्वभूमी असल्याचं बोललं जातंय. पण सीपीआयने नुकताच कन्हैया कुमार यांच्याविरोधात ठराव मंजूर केल्याचं बोललं जात आहे.

सीपीआयची ही कारवाई येथील पक्षाच्या प्रादेशिक मुख्यालयातील संबंधित एका प्रमुख अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीनंतर झाली होती. यापूर्वी लोकसभा निवडणुकीदरम्यान कन्हैया कुमार आणि त्यांच्या पक्षादरम्यान तणाव वाढला होता. यावेळी भाकपाने निवडणूक लढवण्यासाठी मिळालेल्या रकमेचा हिस्सा वाटण्यासाठी दबाव आणला होता.

कन्हैया कुमार यांनी आपल्या मूळ गावी बेगूसराय येथून लोकसभा लढवली. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते गिरीराज सिंह यांनी त्यांचा पराभव केला. कन्हैय्या कुमार तसेच चौधरी यांच्या निकटवर्तीयांनी हे भेट राजकीट नसल्याचं जोर देऊन सांगितलं. तसंच दोन्ही नेते दीर्घ काळापासून एकमेकांना ओळखतात, असं सांगण्यात आलं. तर कन्हैया कुमार आणि जेडीयूच्या वरिष्ठ नेत्याने घेतलेली भेट ही योग्य नसल्याचं भाजपचे राज्यमंत्री सुभाष सिंह म्हणाले. कन्हैया कुमार हे मानसिक रोगी असल्याची टीकाही त्यांनी केली.

कन्हैया यांनी आपली विकृत विचारधारा सोडल्यास आमच्या पक्षात त्यांचं स्वागतच आहे, असं जेडीयूचे प्रवक्ते आलोक यांनी सांगितलं. तर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाने (RJD) आपल्या विरोधात उमेदवार उभा केला होता. याच आरजेडीसोबत विधानसभा निवडणुकीत पक्षाने युती केल्याने कन्हैया कुमार हे नाराज होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here