नवी दिल्लीः पर्यावरणवादी टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आणखी मोठा दावा केला आहे. दिशा रवीच्या ( ) सांगण्यावरूनच ग्रेटाने ट्वीटरवरून आपले ट्वीट हटवले होते. एवढचं नाही तर ग्रेटा थनबर्गचे ( ) संपादित ट्वीटही दिशा रवीनेच एडिट केले होते, असं पोलिसांनी म्हटलं आहे. तसंच बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यामुळे (uapa act) दिशा रवीने ग्रेटा थनबर्गला आपलं ट्वीट हटवण्यास सांगितलं होतं. कारण त्यातील दस्तावेजात दिशाचेही नाव होते, असं पोलिसांनी सांगितलं.

स्वीडनमधील पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत एक ट्वीट केलं होतं. या ट्वीट सोबत तिने टूलकिटही ( दस्तावेज ) शेअर केलं. यावरून मोठा वाद झाल्यानंतर तिने हे ट्वीट हटवले. काही वेळानंतर तिने त्याच टूलकिटची (दस्तऐवज) संपादित आवृत्ती ट्वीट केली. आधीची टूलकिट जुनी आहे. यामुळे ती हटविली गेली आहे, असं तिने म्हटलं. ग्रेटा थनबर्गने दिशा रवीच्या विनंतीवरून आपलं ट्वीट हटवलं होतं आणि नंतर, दस्तऐवजाची संपादित आवृत्ती शेअर केली होती, जी स्वतः दिशाने संपादित केली होती, असा आरोप दिल्ली पोलिसांनी केला आहे.

दिशाने व्हॉट्सअ‍ॅपवरून ग्रेटा थनबर्गला मेसेज केला होता ‘ठीक आहे, टूलकिट पूर्णपणे ट्विट न करणं शक्य आहे का? आपण थोडा वेळ थांबू शकतो का? मी वकिलांशी बोलणार आहे. मी दिलगीर आहे, परंतु आमची त्यावर नावे आहेत आणि युएपीए अंतर्गत आमच्यावर कारवाई केली जाऊ शकते. यूएपीए कायद्यांतर्गत कारवाई होण्याच्या भीतीने दिशाने ग्रेटाला हे सांगितलं होतं, असा दावा पोलिसांनी केला.

‘हे एक गतिशील दस्तावेज आहे. ज्यात मोठ्या प्रमाणावर हायपरलिंक्स, विविध Google ड्राइव्ह, गुगल डॉक्स आणि वेबसाइट्सच्या लिंक आहेत. यात एक ‘आस्क इंडियावॉय.कॉम’. या वेबसाइटचाही समावेश आहे. वेबसाइटमध्ये खालिस्तानी समर्थक बाबी आहेत. म्हणूनच हा दस्तावेज एक मोठी कृती योजना आहे, अशी माहिती दिली पोलिसांनी टूलकिटबाबत दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here