मुख्यमंत्री अनेक दिवसांपासून जाहीर सभा घेत होते. नागरिकांना भेटत होते. महापालिका निवडणुकांचा प्रचार करत होते. त्यांची प्रकृती खालावली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे ते करोना पॉझिटिव्ह आढळून आले. सुमारे आठवडाभर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केला जाईल, असं गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी सांगितलं.
स्टेजवरच प्राथमिक उपचार देण्यात आले
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी रुपाणी रविवारी बडोद्याच्या निजामपुरा येथे पोहोचले. येथील सभेत ते रुपानी भोवळ येऊन पडले. यानंतर त्यांची सभा रद्द करण्यात आली. स्टेजवरच डॉक्टरांनी रुपानी यांना प्रथमोपचार दिले. यानंतर तो स्वत: चालत स्टेवरून खाली उतरले. उपचारानंतर रुपाणी अहमदाबादला रवाना झाले.
रुपानी यांची प्रकृती दोन दिवसांपासून ठिक नव्हती. तरीही त्यांनी जामनगरमध्ये सबा घेतली. त्यानंतर ते रविवारी बडोद्यात पोहोचले. बडोद्यासह ६ महापालिकांची २१ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. तर नगरपालिका, जिल्हा परिषदांसाठी २८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
पंतप्रधान मोदींनी फोन करून त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. तर मुख्यमंत्री रुपयांनी यांची प्रकृती आता चांगली आहे. गांधीनगरला जाण्यापूर्वी बडोदा विमानतळावरही डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्यानंतर अहमदाबादमध्ये त्यांची संपूर्ण तपासणी केली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करून मुख्यमंत्री रुपानी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसंच त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times