औरंगाबाद: राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून नवीन बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. याबाबत आज उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांनी महत्त्वाची विधाने केली. त्यात थांबवण्याचा तूर्त कोणताही विचार नसल्याचे सांगत टोपे यांनी मोठा दिलासा दिला आहे. ( )

वाचा:

राज्यात करोना साथ नियंत्रणात आल्याचे वाटत असतानाच स्थिती अचानक बदलू लागली आहे. गेल्या दोन आठवड्यांत राज्यात २० हजारावर नवीन करोना बाधितांची भर पडली आहे. हा आकडा मोठा असल्याने त्यावर अजित पवार आणि राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली. अजित पवार यांनी पुन्हा कठोर निर्णय घेतले जाण्याचे स्पष्ट संकेत दिले तर राजेश टोपे यांनी हा अंतिम पर्याय असल्याचे सांगून एकप्रकारे धोक्याची घंटाच वाजवली. यावेळी मुंबईतील उपनगरीय लोकल सेवेबाबतही टोपे यांनी महत्त्वाचे विधान केले.

वाचा:

मुंबईत सर्वांसाठी लोकल रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर रुग्णसंख्या वाढल्याचे निदर्शनास आले आहे. तरी सामान्य प्रवाशांना कमी गर्दीच्या वेळीच प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली असल्याने लोकल सेवा थांबवण्याचा तूर्त कोणताही विचार नसल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले. लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ नये, हे आमचे स्पष्ट मत आहे. म्हणूनच नागरिकांनी जे नियम आहेत ते काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे, असे आम्ही वारंवार सांगत आहोत, असेही टोपे यांनी नमूद केले. युरोपात करोनाची दुसरी लाट आल्यानंतर पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आला, याकडे लक्ष वेधताना राज्याच्या सध्याच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्ध‌व ठाकरे यांच्याशी चर्चा करून कडक नियमांचा निर्णय घेऊ, असेही राजेश टोपे यांनी नमूद केले.

वाचा:

राज्यात दररोज चार हजाराच्या आसपास नवीन करोना बाधित रुग्ण आढळत आहेत. हे पाहता करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही मात्र, हा शेवटचा पर्याय असेल. इतर बाबतीत कडक नियम लावण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करण्यात येईल, असेही टोपे पुढे म्हणाले. सध्या नागपूर जिल्ह्यात २६२८, वर्धा जिल्ह्यात ४६६, औरंगाबाद जिल्ह्यात ५१८ करोनारुग्ण आहेत, असेही त्यांनी सांगितले. राज्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण यशस्वी झाले आहे. मार्च महिन्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण जाहीर होणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारने ही सुविधा मोफत दिल्यास करोनाची परिस्थिती नियंत्रणात येईल, असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला. औरंगाबाद विभागाची जिल्हा वार्षिक योजना बैठक विभागीय आयुक्तालयात पार पडली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टोपे बोलत होते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here