म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

‘आपले लाडके हे ज्या जामखेड कर्जत मतदारसंघातून निवडून येतात, त्या मतदारसंघातील चौंडी गावात पुण्यश्लोक यांचा जन्म झाला, असा नवा शोध राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी लावला, राजकीय स्वार्थासाठी आपल्या परिवारातील माणसांचे महत्त्व वाढविण्याचा पवार यांचा हा प्रयत्न आहे,’ अशी उपरोधिक टीका भाजपचे आमदार यांनी सोमवारी केली.

‘रोहित पवार ज्या विधानसभा मतदारसंघात निवडून आले, त्या कर्जत जामखेड मतदारसंघातील चौंडी गावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला,’ असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जेजुरी येथील कार्यक्रमात केले होते. यावर आमदार पडळकर यांनी टीका केली आहे. आपल्या परिवारातील रोहित पवार यांचे महत्त्व वाढविण्याचा हा प्रयत्न आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान हे जामखेड कर्जत मतदारसंघ आहे, असे पवार यांनी बोलायला हवे होते. परंतु, पवार परिवाराचे महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न केला गेला, असे पडळकर यांनी सांगितले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थानाच्या नावाने या मतदारसंघाची ओळख दिली पाहिजे, असेही ते म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here