पुणेः मुंबई- एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. ट्रेलर, कार आणि टॅम्पो या तीन गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात घडला आहे.

मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर एका कंटेनरने टेम्पोला धडक दिली. त्यानंतर टेम्पो पलटी झाल्यावर मागून येणाऱ्या दोन कार टेम्पोला धडकल्या. तर, या चार गाड्यांवर मागून भरधाव येणारा टेम्पो धडकला, असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात एकाच कुटुंबाचा मृत्यू झाला आहे. तर, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात झुंझारे कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. हे कुटुंब नवी मुंबईत वास्तव्यास असून एका कार्यक्रमासाठी पुण्याला गेले होते. पुण्याहून मुंबईच्या दिशेनं परतत असताना फुडमॉल जवळ हा अपघात घडला आहे. यात झुंझारे कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला असून ११ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. तर, दुसऱ्या कारमधील एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

अपघातातील मृतांची नावं

१) श्रीमती मंजू प्रकाश नाहर, वय ५८
२) डॉ. वैभव वसंत झुंझारे, वय ४१
३) सौ. उषा वसंत झुंझारे, वय ६३
४) सौ. वैशाली वैभव झुंझारे, वय ३८
५) कु.श्रिया वैभव झुंझारे, वय-५

अपघातातील जखमींची नावं

१) स्वप्नील सोनाजी कांबळे, ३० वर्षे, (जखमी)
२) प्रकाश हेमराज नाहर, वय-६५, (जखमी )
३) कु.अर्णव वैभव झुंझारे, वय-११, (जखमी)
४) किशन चौधरी, (गंभीर जखमी)
५) काळूराम जमनाजी जाट (गंभीर जखमी)

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here