महंमदवाडी परिसरात आत्महत्या केलेल्या हिच्या नातेवाइकांचा जबाब घेण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक तिच्या गावी गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. पूजाच्या वडिलांनी आपली कोणाच्याही विरोधात तक्रार नसल्याचे सांगितले आहे.
परळी येथील पूजा चव्हाण (वय २२, हेवन पार्क, महंमदवाडी) या तरुणीने सात फेब्रुवारी रोजी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले होते. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याचे नाव असल्याची चर्चा सुरू आहे.
याबाबत काही ऑडिओ क्लिपदेखील सोशल मीडियावरून प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर माजी मुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषदेत ‘त्या’ मंत्र्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. यावर ‘मुख्यमंत्र्यांनी चौकशीनंतर कारवाई केली जाईल,’ असे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांकडून या प्रकरणाची माहिती घेतली. ‘हे प्रकरण तापत असताना पुणे पोलिसांचे एक पथक पूजाच्या नातेवाइकांचे जबाब घेण्यासाठी गेले आहे,’ अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times