मुंबई: नायर रुग्णालयातील एका २८ वर्षीय डॉक्टरने आत्महत्या केली. काल मध्यरात्री त्याने स्वतःला इंजेक्शन टोचून घेऊन जीवनयात्रा संपवली. त्याने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले यामागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

नायर रुग्णालयातील २८ वर्षीय डॉक्टरने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मध्यरात्री त्याने स्वतःला इंजेक्शन टोचून घेतले. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरचा मृतदेह त्याच्या खोलीत आढळून आला असून, विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, डॉक्टर मूळचा औरंगाबाद येथील राहणारा होता. तो काही दिवस रजेवर होता. तो पुन्हा रुजू झाला होता. काल मध्यरात्री खोलीत त्याचा मृतदेह आढळून आला. इंजेक्शन टोचून घेत त्याने जीवन संपवले. आत्महत्येमागील कारण कळू शकलेले नाही. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. नायर रुग्णालयात यापूर्वी २०१९ मध्ये डॉ. पायल तडवी हिनेही आत्महत्या केली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here