कोणताही संघ विजायानंतर संघात जास्त बदल करत नाही, असे म्हटले जाते. पण भारतीय संघ मात्र तिसऱ्या कसोटी सामन्यात बदल करणार असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण तिसरा कसोटी सामना हा दिवस-रात्र असणार आहे. त्यामुळे दिवस-रात्र कसोटीनुसार भारतीय संघाला आपला संघ बदलावा लागणार आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी फिरकीपटू कुलदीप यादवला वगळण्यात येऊ शकते, असे आता दिसत आहे. कारण कुलदीप आणि अक्षर पटेल या दोघांना या सामन्यात संधी दिली होती. पण कुलदीपला या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात कुलदीपला डच्चू दिला जाऊ शकतो, असे आता दिसत आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराचे संघात पुनरागमन होऊ शकते, असे दिसत आहे. कारण दिवस-रात्र कसोटीत बुमरा हा संघासाठी महत्वाचा ठरू शकतो. त्याचबरोबर बीसीसीआयच्या निवड समितीने पहिल्या दोन सामन्यांसाठी भारताचा संघ निवडला होता. त्यामुळे आता तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी नव्याने संघ निवडण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात कोणाची निवड होते आणि कोणाल डच्चू मिळतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
विजयानंतर विराट कोहली नेमकं काय म्हणाला पाहा…
पराभवामुळे आम्ही निराश झालो नव्हतो. तो पराभव आम्ही विसरलो आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या कसोटी सामन्याचा विचार करायला सुरुवात केली होती. दुसऱ्या सामन्यात काय रणनिती आखायची, याचाच विचार आम्ही करत होतो. सर्व खेळाडूंनी चांगले योगदान दिले, त्यामुळेच आम्हाला हा विजय मिळवता आला आहे. पहिल्या डावात खेळताना माझ्याकडून चुक झाली होती. पण ही चुक मी तात्काळ सुधारण्याचा निर्णय मी घेतला होता. दुसऱ्या डावात खेळताना मी त्या चुका टाळल्या. त्यामुळे मला दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करता आली. त्याचबरोबर दुसऱ्या डावात अश्विनबरोबर झालेली भागीदारीही महत्वाची ठरली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times