चेन्नई, : भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे. पराभवानंतर निवडण्यात आलेल्या या संघात कोणाला संधी मिळाली आहे आणि कोणाला डच्चू, हे पाहता येऊ शकते. अहमदाबाद येथे तिसरा कसोटी सामना दिवस-रात्र खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंडच्या संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी आपल्या संभाव्य १७ खेळाडूंचा संघ आज जाहीर केला आहे. यावेळी संघाचे कर्णधारपद जो रुटकडे कायम ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर संघाची गोलंदाजी यावेळी अधिक बळकट करण्याता आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण दिवस-रात्र कसोटी सामन्यात गोलंदाजांची कामगिरी महत्वाची ठरत असते.

इंग्लंडच्या या संघात दुसऱ्या सामन्यात वगळण्यात आलेल्या जेम्स अँडरसनला संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर अँडरसनबरोबर स्टुअर्ट ब्रॉड, जोफ्रा आर्चर, मार्क वुड आणि ख्रिस वोक्स या अनुभवी गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर अनुभवी अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सलाही या संघात स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर जॉनी बेअरस्टोही या संघात आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर इंग्लंडच्या या संघात डॉमिनिक बेस, रोरी बर्न्स, जॅक क्राऊले, बेन फोक्स, डॅन लॉरेंस, जॅक लीच, ओपी पोप, डॉम सिब्ले, ओली स्टोन यांनाही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे इंग्लंडचा हा संघ चांगलाच समतोल वाटत आहे.

पहिल्या सामन्यातील विजयानंतर इंग्लंडच्या संघाला दुसऱ्या सामन्यात पराभवाचा झटका बसला आहे. त्यामुळे या पराभवातून इंग्लंडचा संघ बरेच काही शिकला असेल. त्यामुळे या सामन्यात झालेल्या चुका ते तिसऱ्या सामन्यात टाळतील, असा त्यांच्या संघ व्यवस्थापनाला विश्वास आहे. त्यामुळे आता तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाची कामगिरी कशी होते, हे पाहणे सर्वात महत्वाचे ठरणार आहे.

तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघजो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, डोमनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जॅक क्राउले, बेन फोक्स, डॅन लॉरेंस, जॅक लीच, ओली पोप, डोम सिब्ले, बेन स्टोक्स, ओली स्टोन, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here