म.टा. प्रतिनिधी, नगर
‘राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते () यांच्या जेजुरी येथील भाषणावर टीका करणारांनी ते नीट ऐकलेले दिसत नाही. या भाषणातून आणि यापूर्वीही पवारांनी () यांचा सन्मानच केला आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढण्यापूर्वीच त्यांनी मला अहिल्यादेवींबद्दल सांगून जबाबदारीने काम करण्याचा सल्ला दिला होता. आम्ही अहिल्यादेवींचा सन्मानच करत आलो आहोत,’ असे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (Rohit Pawar) यांनी भाजपचे माजी मंत्री (Ram Shinde) यांना दिले आहे. (ncp mla gives reply to the criticism by bjp leader )

नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना पवार यांनी हे उत्तर दिले. शरद पवार यांच्या जेजुरीतील भाषणातील उल्लेखामुळे अहिल्यादेवींचा आपमान झाल्याची टीका शिंदे यांनी केली होती. त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवार यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘पवार यांनी होळकर यांचे जन्मस्थान आणि माझा मतदारसंघ यासंबंधी जो उल्लेख केला आहे तो नीट ऐकला पाहिजे. त्यांनी या भाषणातून अहिल्यादेवींचा सन्मानच केला आहे. एवढचे नाही तर जेव्हा मी कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवायची ठरले तेव्हाच मला पवार यांनी अहिल्यादेवींची आठवण करून दिली होती.

क्लिक करा आणि वाचा-

या मतदारसंघातील चोंडी गावात अहिल्यादेवींचा जन्म झाला आहे. तेथे काम करण्याची तुला संधी मिळणार आहे. त्यांनी जसे पाणी आणि अन्य क्षेत्रांत काम करून जनतेची सेवा केली, त्यातून आदर्श घेऊन काम कर. असा सल्ला मला पवार यांनी तेव्हाच दिला होता. मी आजही त्याच जबाबदारीने काम करीत आहे. त्यामुळे यासंबंधाने होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्षच केलेले बरे.’ असेही पवार यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here