काँग्रेसने खोटारडेपणाचे राजकारण केले. त्यामुळे हा पक्ष ४०० जागांवरुन ४० जागावर आला आहे. भविष्यातही अशीच परिस्थिती राहली, तर कॉंग्रेस पक्ष हा इतिहासजमा होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे आणि राहुल गांधी यांनी लवकरच आत्मचिंतन केले पाहिजे. तसे केल्यास त्यांच्यासाठी आणि कॉंग्रेससाठीही ते नक्कीच हिताचे असेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
केंद्र सरकारने संरक्षण उत्पादनांच्या निर्मितीसाठी एचएएल या कंपनीसमवेत १ लाख कोटीचे कंत्राट केले आहे, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सन २०१९ मध्ये लोकसभेत दिली होती. तरीही राहुल गांधी आणि त्यांच्या कॉंग्रस पक्षाने यासंदर्भात जनतेला खोटी माहिती देत देशाच्या संरक्षण विभागाची बदनामी केली होती. त्यानंतर संरक्षण विभागाने या कंत्राटासंदर्भातील सर्व अधिकृत कागदपत्रे प्रसिद्ध करत राहुल गांधींचा खोटारेडपणाचा उघड केला. चीनच्या कथित मदतीने भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्यास एक दिवस जनताच तुमच्या खोटारेडपणाचा पर्दाफाश करेल आणि ही वेळ फार दूर नाही, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडताना दिला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
देशाचे संरक्षण खाते सक्षम असतानाही राहुल गांधी मात्र वारंवार संरक्षण विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असतात. ते विनाकारण अपप्रचार करीत आहेत. २०१८ मध्येही राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी एचएएलसारख्या कंपन्यांची उत्पादन क्षमता कमी करत असल्याची चुकीची माहिती दिली होती. त्यांची ही वक्तव्ये म्हणजे देशाच्या संरक्षण खात्याला जाणूनबुजून बदनाम करण्याचा प्रकार आहे, असे सांगतानाच राहुल गांधींचा हा प्रयत्न निंदनीय असल्याचेही पाटील म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times