सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली एफआयआरची प्रत ही १३ फेब्रुवारी २०२१ ची आहे. ८ फेब्रुवारीला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील माझ्या भाषणाविरोधात शिवसेनेचे लेटरहेड असलेले निनावी पत्र देऊन अपमान आणि शिवीगाळ करण्यात आली आहे. तसंच आठ दिवसांत मला आणि माझ्या पतीला जीवे मारण्याची आणि अॅसिड हल्ल्याची धमकी दिली गेली आहे, असं यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव आडसूळ यांनी हे पत्र पाठवले आहे. लोकशाहीसाठी असे शब्द मुळीच चांगले नाहीत. आपल्यासंबंधी अश्लील शब्दांचा वापर करून धमकी देणारे फोनही केले जात आहेत. कोणत्याही सामान्य स्त्रीविरूद्ध हा गंभीर गुन्हा आहे, असं नवनीत कौर राणा यांनी एफआयआरमध्ये म्हटलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times