३० जानेवारी रोजी शरद पवार हे शहापूर दौऱ्यावर आले होते. भगवान सांबरे रुग्णालय संचलित सुपर कर्करोग स्पेशालिस्ट रुग्णालयाचे पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडही होते. भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर दोऱ्याचा पाडा येथील रामचंद्र खोडके यांच्या घरी पवारांच्या जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. खोडके यांच्या कुडाच्या झोपडीत एक टेबल मांडण्यात आला होता. पवारांसोबत आव्हाड आणि त्यांचे इतर सहकारीही जेवणासाठी बसले होते. यावेळी त्यांना भाजलेल्या कोंबड्याचा रस्सा, कनटोरल्याची भाजी आणि तांदळाची भाकरी वाढण्यात आली. पवारांनीही या भोजनाचा येथेच्छ अस्वाद घेतला. एव्हाना पवार भोजनासाठी कुडाच्या झोपडीत आल्याचं कळल्यानं झोपडीबाहेर गर्दी झाली होती. पवार पंचतारांकित हॉटेलात न जाता चक्क कुडाच्या झोपडीत बसून जेवत असल्याचं पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. त्यामुळे संपूर्ण दिवसभर पवारांच्या या साधेपणाची शहापूरमध्ये चर्चा होती.
यांनी पवारांचा भोजनाचा अस्वाद घेत असतानाचा फोटो त्यांच्या ट्विटरवर पोस्ट केला असून त्याच्याखाली या नेत्याला काय म्हणावे. कुडाची झोपडी.. आदिवासी मावशीने केलेला स्वयंपाक..तांदळाची भाकरी.. भाजलेल्या कोंबड्याचा रस्सा..कनटोरल्याची भाजी..आणि साहेब जेवता आहेत.’ अशी पोस्टही केली आहे. दरम्यान, रुग्णालयाच्या भूमीपूजन सोहळ्यानंतर आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. पवारांनी स्वत: त्यांच्या मोबाइलमध्ये हे नृत्य चित्रीत केलं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times