मुंबई: राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री (Rajendra Shingne) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. शिंगणे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. आज माझी चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोरोनावर मात करुन लवकरच आपल्या सेवेसाठी हजर होईन, असेही राजेंद्र शिंगणे यांनी म्हटले आहे. (Food and Drugs Administration Minister tested corona Positive)

राजेंद्र शिंगणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईन.’

गृहमंत्री अनिल देशमुख, गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनाही झाली होती लागण
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना करोनाची लागण झाल्याचे २ फेब्रुवारी रोजी स्पष्ट झाले होते. देशमुख यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली होती. उपचारानंतर देशमुख यांनी करोनावर मात केली. तर राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांना देखील ९ फेब्रुवारी रोजी करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांनी देखील ट्विटद्वारे ही माहिती दिली होती. आपण करोनावर मात करून लवकरच जनतेच्या सेवेसाठी हजर होणार, असे त्यांनी म्हटले होते.

क्लिक करा आणि वाचा-
राजेंद्र शिंगणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांपैकी एक गणले जातात. महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमध्ये त्यांनी पाचव्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शिंगणे हे बुलडाणा जिल्ह्यात येणाऱ्या सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here