मुंबई: राज्यात पुन्हा करोनाने () उचल खाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून चिंतेचे वातावरण आजही कायम आहे. दिवसभरातील रुग्णवाढीचा विचार करता कालच्या तुलनेत आज नवे रुग्णांची संख्या केवळ दोनने कमी आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात २ हजार ७०० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून दिवसभरात ३ हजार ६६३ नव्या रुग्णांची भर पडली आहे. काल ही संख्या ३ हजार ३६५ इतकी होती. आजची संख्या देखील बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येहून काहीशी अधिक आहे. (maharashtra reported 3663 new cases and 39 deaths today)

आज राज्यात एकूण ३९ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या २३ इतकी होती. आजची मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता सध्या राज्यातील मृत्यूदर २.४९ टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख ८१ हजार ४०८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६६ टक्के इतके झाले आहे.

तसेच राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५३ लाख ९६ हजार ४४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख ७१ हजार ३०६ नमुने पॉझिटिव्ह निघाले आहेत. हे प्रमाण १३.४५ टक्के इतके आहे. सध्या राज्यात १ लाख ८२ हजार ९७० व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर १ हजार ७२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

राज्यातील अॅक्टिव्ह (सक्रिय) रुग्ण

राज्यात आज एकूण ३७ हजार १२५ इतके रुग्ण अॅक्टिव्ह, म्हणजे उपचार घेत आहेत. राज्यातील प्रमुख शहरांचा विचार केल्यास मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४ हजार २३८ इतकी असून ठाण्यात ही संख्या ५ हजारावर पोहोचली आहे. तर, पुण्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७ हजार ०१५, औरंगाबाद येथे ६८२, नागपूर येथे ४ हजार ५९०, कोल्हापूर येथे १५०, नाशिक येथे १ हजार ०३७ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त अॅक्टिव्ह रुग्णसंख्या पुण्यात असून सर्वात कमी रुग्णसंख्या गडचिरोली आहे. येथे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४९ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा-क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here