प्रभासचा आगामी चित्रपट ” त्याच्या यूव्ही क्रिएशन्स प्रोडक्शनखाली रिलीज करत आहे. प्रभासच्या या चित्रपटाची निर्मिती त्याच्याच कंपनीनं केली. या चित्रपटात प्रभाससोबत स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटाचं बरंचसं शूटिंग हे युरोपमध्ये झालं आहे. प्रभासचा हा बिग बजेट चित्रपट येत्या ३० जुलैला रिलीज होणार आहे. लॉकडाऊननंतर रिलीज होणारा प्रभासचा हा पहिलाच चित्रपट आहे. लॉकडाऊनमुळे प्रभासच्या कंपनीला जवळपास १००० कोटींचा तोटा झाला आहे. त्यामुळे आता प्रभासच्या आगामी चित्रपटाकडून सर्वांनाच खूप अपेक्षा आहेत. नेहमीच अॅक्शन चित्रपट करणाऱ्या प्रभासनं या चित्रपटात रोमँटिक व्यक्तिरेखा साकारली आहे.
इन्स्टाग्राम लिंक-
प्रभासनं व्हॅलेंटाइन डेला या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर केला होता. ज्यात त्याच्यासोबत पूजा हेगडे सुद्धा दिसली होती. काही सेकंदाच्या या व्हिडीओमधील प्रभासच्या रोमँटिक अंदाजानं सर्वांची मनं जिंकली. या व्हिडीओच्या सुरुवातीला प्रभासची एंट्री होते. गर्दीतून वाट काढत तो पूजाला भेटतो. तर ती त्याला ‘स्वतःला काय रोमियो समजतोस का?’ असं म्हणते. त्यावर तिला उत्तर देतो, ‘नाही, त्यानं प्रेमात जीव दिला होता. मी त्या टाइपचा नाही आहे.’
‘राधे श्याम’ व्यतिरिक्त प्रभास ‘आदिपुरुष’मध्येही दिसणार आहे. ज्यात तो भगवान श्रीरामांची भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं होतं. पण सेटला आग लागल्यानं ते थांबवण्यात आलं आहे. या चित्रपटात प्रभाससोबत कृती सेनन आणि अजय देवगण यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times