म.टा. प्रतिनिधी,

यंदा नागपूरकर फेब्रुवारी महिन्यातही पाऊस अनुभवत आहेत. मंगळवारी शहरात तसेच विदर्भातील अन्य काही जिल्ह्यांमध्ये अचानक वादळी पावसाने (heavy rains in nagpur) हजेरी लावली. बुधवारी तर काही ठिकाणी वादळी पावसासह गारपिटीचीही शक्यता (possibility of a ) वर्तविण्यात आली आहे. (heavy rains in nagpur and parts of )

प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार मंगळवारी शहरात वादळी पावसाची हजेरी लागली. बुधवारीसुद्धा वादळी पावसाची शक्यता असून काही ठिकाणी तर गारपिटीचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यंदा सातत्याने ढगाळ आणि पावसाळी वातावरणामुळे फारशी थंडी जाणवलेली नाही.

क्लिक करा आणि वाचा-
जानेवारी महिन्यातील लपंडावानंतर फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला परत एकदा थंडी जाणवू लागली होती. तापमान १० अंशांपेक्षाही खाली गेले होते. परंतु गेल्या तीन दिवसांपासून आकाशात ढगांचे अस्तित्व जाणवू लागले. त्यामुळे तापमानात वाढ झाली. त्यात मंगळवारी पाऊस झाला. गुरुवारपर्यंत पावसाळी कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here