गृह राज्यमंत्री देसाईंनी दिले चौकशीचे आदेश
पुण्यातील दोन हत्या प्रकरणातून तळोजा कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर मारणे याने ३०० गाड्यांच्या ताफ्यासह मिरवणूक काढली. या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करणार असे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. तुरुंगातून सुटल्यानंतर अशा पद्धतीने मिरवणूक काढणे हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे, असेही गृह राज्यमंत्री देसाई म्हणाले.
काल सोमवारी मारणे याची तळोजा कारागृहातून मुक्तता करण्यात आली. त्यावेळी कारागृहाबाहेर त्याच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. मारणेची मिरवणूक एक्स्प्रेस वेवरून काढण्यात आली. दरम्यान त्याच्या साथीदारांनी उर्से टोल नाक्यावर फटाके फोडले. तसेच आरडाओरड देखील केला. यावेळी त्याने ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने चित्रीकरणही देखील केले. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात मारणेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
क्लिक करा आणि वाचा-
राज्याचे गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी हे प्रकरणा गांभीर्याने घेतले असून या प्रकरणी ते पुण्याच्या पोलिस आयुक्तांशी चर्चा करणार आहेत. कालच्या मिरवणुकीतील व्हिडिओ क्लिप्स तपासल्या जाणार आहेत. मारणेने बेकायदेशीरपणे जमाव जमवला आहे का, याचीही चौकशी करण्यात येणार आहे.
क्लिक करा आणि वाचा-क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times