दैनंदिन वाहतुकीसाठी वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या डिझेलच्या किंमतीपेक्षा आकाशात भरारी घेण्यासाठी विमानात वापरल्या जाणाऱ्या डिझेलचे (Diesel) दर कमी आहेत (aircraft fuel 40 per cent cheaper), असे सांगितले तर विश्वास बसेल ? हे खरे असेल तर रोजच्या कामासाठी विमान वापरावे का, असा मिश्कील भाव मनात नक्की उमटेल; पण हे खरे आहे. इंधनाचे दर रोज सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत असताना तुलनेने चैनीच्या वाहतुकीसाठी वापरले जाणारे इंधन चाळीस टक्क्यांनी स्वस्त असल्याची माहिती मिळाली आहे. (diesel prices have skyrocketed with than )
डिझेलच्या दरवाढीने उच्चांक गाठला असून, चक्क विमानाचे इंधन (एव्हिएशन टर्बाइन फ्युएल – एटीएफ) ट्रकच्या डिझेलच्या किंमतीपेक्षा ४० टक्क्यांनी स्वस्त आहे. पेट्रोल-डिझेलवर लावले जाणारे विविध कर विमानाच्या इंधनावर लावले जात नाही. त्यामुळे विमानाचे इंधन ट्रकसारख्या वाहनांसाठी लागणाऱ्या डिझेलच्या किंमतीपेक्षा स्वस्त आहे. त्यामुळे इंधनावरील कराचा भार विमानाने प्रवास करणाऱ्यांपेक्षा ट्रकचालकांसारख्या सर्वसामान्यांना अधिक पेलावा लागत असल्याचे निदर्शनास येते.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींने नागरिक हैराण झाले आहेत. पुण्यात पेट्रोलचा भाव प्रतिलिटर ९५ रुपये, तर डिझेलचा भाव प्रतिलिटर ८५ रुपयांच्या घरात आहे. विमानासाठी लागणाऱ्या ‘एटीएफ’ इंधनाचा भाव मात्र प्रतिलिटर ५५ ते ६० रुपये आहे.
या तफावतीमागील कारण सांगताना सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर म्हणाले, ‘विमानाला लागणाऱ्या इंधनावर केंद्र सरकारचे कर अत्यंत कमी आहेत. आणि डिझेलवर लागू असलेला ‘सेस’ (उपकर) विमानााच्या इंधनावर नाही. नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात आलेला कृषी अधिभारही विमानाच्या इंधनावर लावण्यात आलेला नाही. त्यामुळे ट्रकसारखी अवजड मालवाहतूक वाहने ज्यावर चालतात, त्या डिझेलच्या प्रतिलिटर किंमतीपेक्षा विमानाचे प्रतिलिटर इंधन सुमारे ४० टक्क्यांनी स्वस्त आहे.’
देशातील प्रमुख शहरांमधील स्थिती
मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ९५.७३ रुपये, ८६.७ रुपये तर एव्हिएशन टर्बाइन फ्लूएल ५३.८५ रुपयांना प्रतिलिटर मिळत आहे. तर
दिल्लीत पेट्रोल ८९.३३ रुपये, डिझेल ७९.७४ रुपये आणि एव्हिएशन टर्बाइन फ्लूएल ५५.७३ रुपये प्रतिलिटर मिळत आहे. तसेच,
चेन्नईत पेट्रोल ९१.४४ रुपये, डिझेल ८४.७५ रुपये आणि एव्हिएशन टर्बाइन फ्लूएल ५६.८७ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. तर
कोलकत्यात पेट्रोल ९०.५२ रुपये, डिझेल ८३.२७ रुपये आणि एव्हिएशन टर्बाइन फ्लूएल ६०.१६ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times