वाचा:
सौरभ राव हे विभागीय आयुक्त कार्यालयात ही आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीला पुणे जिल्हाधिकारी, पुणे आणि महापालिकांचे आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहे. सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी हे बैठकीत ऑनलाइन सहभागी होणार आहेत. या बैठकीत पाचही जिल्ह्यांमधील करोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन प्रतिबंधात्मक उपायोजनांबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले निर्देश लक्षात घेता ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
वाचा:
मुख्यमंत्री काय म्हणाले?
राज्यात काही जिल्ह्यांमध्ये रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साथला व स्थितीचा आढावा घेतला. यावेळी करोना विषयक सर्वत्र दाखविल्या जाणाऱ्या बेफिकीरीबाबत चिंता व्यक्त करतानाच करोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची (एसओपी ) कडक अंमलबजावणी करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले. मास्क वापरा आणि गर्दी टाळा अन्यथा राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिला. सार्वजनिक कार्यक्रम, सभा, विवाह समारंभ आदींमध्ये उपस्थितांची संख्या मर्यादीत ठेवायची आहे व सर्वच ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक आहे. त्यामुळे जे नियमाचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. त्याअनुषंगाने पुणे विभागीय आयुक्तांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
वाचा:
ही आहे करोनाची राज्यातील आजची स्थिती
– राज्यात आज ३९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४९ % एवढा आहे.
– आज राज्यात ३ हजार ६६३ नवीन रुग्णांचे निदान तर २ हजार ७०० रुग्ण बरे होऊन परतले घरी.
– राज्यात आजपर्यंत एकूण १९,८१,४०८ करोना बाधित रुग्णांची करोनावर मात.
– राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.६६ टक्क्यांवर.
– आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५३,९६,४४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,७१,३०६ (१३.४५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह.
– सध्या १,८२,९७० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,७२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times