‘हम दो, हमारे दो’च्या वक्तव्यावरून आठवले यांनी राहुल गांधींना सल्ला दिला आहे. “हम दो, हमारे दो” ची घोषणा ही कुटुंब नियोजनासाठी दिली जात होती. जर त्यांना राहुल गांधींना त्याचा प्रचार करायचा असेल तर त्यांनी आधी लग्न केलं पाहिजे. आणि त्यांना लग्ना करायचं असेल तर ते दलित मुलीशी केले पाहिजे. यातून महात्मा गांधींचे जातीयवाद हटवण्याचे स्वप्न पूर्ण केले पाहिजे. राहुल गांधींच्या या कृतीतून तरुणांना प्रेरणा मिळेल, असं रामदास आठवले म्हणाले.
रामदास आठवले एवढ्यावरच थांबले नाही तर राहुल गांधींना त्यांनी आवाहनही केलं. राहुल गांधी आंतरजातीय विवाह केल्यास सरकार त्यांना २.५ लाख रुपयांचा मदत निधीही देईल, असं रामदास आठवले म्हणाले.
राहुल गांधी यांनी संसदेत ११ फेब्रुवारीला भाषण करताना राहुल पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला होता. ‘एकेकाळी’ हम दो, हमारे दो ‘चा नारा दिला जायचा. त्याचे एक सुंदर बोधचिन्ह होते. ज्यात सुंदर आणि गुटगुटीत चेहरे होते. आता तीच स्थिती आहे. करोना जसा आपलं स्वरूप बदलून आला तसंच आता देशात होतंय. हा देश फक्त चार जण चालवत आहेत. म्हणजेच ‘हम दो, हमारे दो’ हे सरकार चालवत आहेत. त्यांची नावं घेणार नाही. पण ते लोक कोणा आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते.
राहुल गांधी यांनी केंद्राच्या नवीन कृषी कायद्यांवरून सरकारवर निशाणा साधला. हम दो, हमारे दोन म्हणत राहुल गांधी यांनी सरकारच्या भांडवलशाही धोरणावर टीका केली. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा, तसंच अंबानी आणि अदानी यांच्यावर राहुल गांधी यांचा रोख होता. राहुल गांधी मात्र त्यांचा उल्लेख करणं टाळलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times