राणे ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते. राज्य सरकारकडून निधी येणे शिल्लक असल्याचा उल्लेख ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. त्यावर नारायण राणे यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारले असता त्यांनी शिंदेंवर वरील टीका केली. शिंदे यांच्याकडे राज्याचे नगरविकास खाते आहे. महापालिकांना त्यांच्या हक्काचे पैसे देणे ही त्यांचीच जबाबदारी आहे. शिंदे यांनीच ठाणेकरांचा निधी अडवला आहे. त्यामुळे ते सर्व पैसे त्यांच्या कडेच आहेत, असे राणे म्हणाले.
‘शिवसेना तोंडाला पाने पुसण्याचे काम करते’
सरकारने अजूनही ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी दिलेली नाही याकडेही राणे यांनी लक्ष वेधले. अगोदर वचने देतात आणि त्यानंतर तोंडाला पाने पुसण्याचे काम शिवसेना करते अशी टीकाही राणे यांनी केली.
ठाण्यातील अनधिकृत बांधकामांच्या मुद्दयावरही राणे बोलले. ठाण्यातील अनधिकृत बांधकामांवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. अशा बांधकामांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करायची सोडून तक्रार करणाऱ्यांवरच गुन्हे दाखल केले जात आहेत असे सांगत अधिकारी आणि शिवसेनेची मिलीभगत असल्याचा आरोप राणे यांनी केला.
क्लिक करा आणि वाचा-
इंधनदरावरून राज्य सरकारला मारला टोला
इंधनाच्या वाढत्या किंमतीवर महाविकास आघाडीचे सरकार केंद्र सरकारवर टीका करत आहे. मात्र कर कपात करून राज्य सरकार इंधनाचे दर कमी करू शकते. असे करता येत असताना राज्य सरकार ते करत नाही. केंद्र सरकारला दोष देण्यापेक्षा महाविकास आघाडी सरकारने कर कपाच करून सर्वसामान्यांना दिलासा दिला पाहिजे, असे टोलाही राणे यांनी राज्य सरकारला हाणला.
क्लिक करा आणि वाचा-
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times