हरिद्वार: हरिद्वारमध्ये होणारा कुंभ २०२१ चा मेळा ( haridwar kumbh mela ) आता फक्त एप्रिल महिन्यातच संपन्न होणार आहे. सहसा कुंभमेळा ( kumbh mela ) जानेवारीपासून सुरू होत असतो. पण यंदा कोविडमुळे कुंभमेळा हा फक्त एप्रिल महिन्यापूरताच मर्यादित असेल. कुंभमेळ्याची अधिकृत अधिसूचना मार्च महिन्यात जारी होईल आणि महाशिवरात्रीचे स्नान कुंभच्या अधिसूचनेनंतर होईल, असा अंदाज गेल्या काही दिवसांपासून वर्तविला जात होता.

उत्तराखंडचे मुख्य सचिव ओमप्रकाश यांनी मंगळवारी आदेश दिले. कुंभमेळा १ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान होईल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना कायम राहतील की राज्य सरकारच्या इतर नियमांची अंमलबजावणी केली जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

अखिल भारतीय अखाडा परिषदेचे सरचिटणीस श्रीमंत हरिगिरी यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले जाईल. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टात शेकडो याचिका प्रलंबित आहेत. करोना हा एक संसर्गजन्य रोग आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासन जे काही निर्णय घेईल त्यानुसार कुंभमेळा पार पाडला जाईल, असं हरिगिरी म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here