म. टा. विशेष प्रतिनिधी,

मागील दोन आठवड्यापासून सर्दी व खोकल्याचा त्रास मुंबईकरांमध्ये वाढताना दिसत आहे. पूर्वीप्रमाणे हा त्रास अंगावर न काढता लक्षणे दिसताच वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयामध्ये येणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.

संसर्गाचा फैलाव झाल्यानंतर सर्वसामान्यांनी जीवनशैलीमध्ये बदल केला. पोषक आहार, व्यायामावर भर दिल्यामुळे एरव्ही जे आजार होतात, त्यांचे प्रमाण कमी झाले होते. मास्क लावल्यामुळे सर्दी, खोकला वा इतर ऋतूबदलामुळे होणाऱ्या आजारांचा त्रासही नियंत्रणात होता. मात्र सध्या सर्दी, खोकल्यांचा त्रास वाढला आहे. नाकातून पाणी येणे, सतत शिंका येणे, खोकल्याची उबळ येणे, खोकला येत असताना मूत्रविसर्जनावरील नियंत्रण निघून जाणे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी भेडसावत आहे. खोकला वा सर्दी ही ऋतूबदलामुळे असेल तरीही हा त्रास अंगावर काढू नका, कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, असा आग्रह फिजिशिअन डॉ. आर. एस. प्रभाकर यांनी व्यक्त केला.

वाचा:

सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांमध्ये अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन येणाऱ्यांचे प्रमाण दहा टक्के असल्याचे दिसते. तीन दिवसांपेक्षा अधिक काळ हा त्रास कमी झाला नाही तर अशा रुग्णांना करोनाच्या चाचण्या करून घेण्यासाठी सांगितले जाते. मात्र या रुग्णांमधील निम्मे रुग्ण पुन्हा वैद्यकीय उपचारांसाठी येत नाही, असेही निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. खोकला, सर्दी वा अन्य कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका तसेच ही लक्षणे अंगावर काढू नका, असाही सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

‘काढ्यांचा अतिरेक नको’

करोना संसर्गाची सुरुवात झाली होती तेव्हा या आजाराला दूर ठेवण्यासाठी काढे घेण्याकडे सर्वसामान्यांचा कल होता. मात्र त्यातून उष्णतेचा त्रास होऊन सतत शौचास होणे, पोटात मुरडा येणे, तोंडामध्ये फोड येणे तसेच त्वचेवर अॅलर्जीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणामध्ये आढळून आल्या. त्यामुळे अशा प्रकारच्या काढ्यांचा अतिरेक करू नका, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here