मुंबई:
बॉलिवूड कोरिओग्राफर गणेश आचार्यवर काही दिवसांपूर्वी एका महिला कोरिओग्राफरने तो मुलींना बळजबरीने पॉर्न दाखवतो असा आरोप केला होता. या प्रकरणी या महिला कोरिओग्राफरने पोलिसांत तर तक्रार केली होतीच. पण महिला आयोगाकडेही तक्रार केली होती. या प्रकरणी आता गणेश आचार्यने कोर्टात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेश आचार्यने शनिवारी पत्रकार परिषद घेतली. त्याने सांगितलं की आंबोली आणि ओशिवरा पोलीस ठाण्यात त्याने त्याच्यावर लागलेल्या आरोपांवर एनसी दाखल केली आहे आणि तो कोर्टात जाण्याची तयारी करत आहे. या पत्रकार परिषदेत गणेशसोबत त्याची पत्नीही उपस्थित होती. तिने सांगितंल की १९ वर्षांपासून गणेशसोबत आहे आणि त्याचावर तिचा पूर्ण विश्वास आहे.

मी चिखल साफ करणार आहे: गणेश

या पत्रकार परिषदेत गणेशला विचारलं की त्याच्यावर झालेल्या चिखलफेकीमुळे त्याची प्रतिमा मलीन झाली आहे, त्यावर त्याचं काय म्हणणं आहे. त्यावर गणेश म्हणाला, ‘जेव्हा चिखल उडतो, तेव्हा तो धुवायचाही असतो. मी चिखल कशाला सुकवू अंगावर? मला किंवा माझ्या कुटुंबीयांना या आरोपांमुळे प्रॉब्लेम झालेला नाही. लोकांनाही ठाऊक आहे की काय आहे आणि काय नाही. जर डान्सर्स आणि नृत्य दिग्दर्शकांमध्ये चिखल असेल आणि तो माझ्या अंगावर उडणार असेल तर तो स्वच्छ करण्यासाठीच मी उतरलो आहे.’

नेमकं काय घडलं होतं?

नृत्यदिग्दर्शक विरुद्ध ३३ वर्षीय महिलेने अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गणेश महिलेला अश्लिल व्हिडिओ पाहण्याची सक्ती करायचा असा आरोप त्यांनी केला आहे. याशिवाय सिनेसृष्टीत तो काम मिळण्यात अडथळे निर्माण करायचा आणि मिळकतीतही तो कमिशन मागायचा.

महिलेने तक्रारीत म्हटलं की, ‘जेव्हापासून गणेश इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन कोरिओग्राफर्स असोसिएशनचा जनरल सेक्रेटरी झाला तेव्हापासून मला त्रास देत आहे. जेव्हा मी गणेशची गोष्ट ऐकली नाही, तेव्हा गणेशने त्याच्या पदाचा वापर करून मला एसोसिएशनमधून काढून टाकलं. याशिवाय गणेशने मला त्याची सहाय्यक म्हणून काम करायला सांगितले होते. पण मी त्यासाठी स्पष्ट नकार दिला. मला स्वतंत्रपणे काम करायचं होतं.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here