मुंबई- कोणत्याही कट्टर चाहत्याला आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला पाहता येणं हे त्याच्यासाठी कोणत्याही दिवाळी- दसऱ्याहून कमी नसतं. त्यातही स्टार सेलिब्रिटींसाठीचं वेड एकीकडे आणि आर्चीसाठीचं चाहत्यांचं वेड दुसरीकडे. रिंकू राजगुरूची एक झलक पाहण्यासाठी आजही शेकडो- हजारांच्या संख्येने लोक जमा होताना दिसतात.

नांदेड येथील सारखनी भागातील लेंगी महोत्सवाला रिंकूला खास पाहुणी म्हणून बोलावण्यात आलं होतं. आता आपल्या गावात येणार म्हटल्यावर तिथे उपस्थितांमध्ये एक वेगळीच उर्जा संचारली. तिला पाहण्यासाठी करोनामुळे लादलेली बंधनंही ग्रामस्थांना नकोशी झाली. तिला पाहण्यासाठी महोत्सवात अक्षरशः झुंबड उडाली होती. आयोजकांनाही रिंकूच्या सुरक्षेसाठी अधिक धावपळ करावी लागली.

दरम्यान, रिंकू राजगुरूच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर, ‘हण्ड्रेड’ या हिंदी वेब सीरिजनंतर आता अॅमेझॉन प्राइमवरील ‘अनपॉज्ड’ या सिनेमात दिसली. ‘अनपॉज्ड’ या सिनेमासाठी पाच बडी मंडळी एकत्र आली. राज अँड डीके, निखील अडवाणी, तनिष्ठा चटर्जी, अविनाश अरूण आणि नित्या महरातो यांनी एकत्रितपणे हा सिनेमा बनवला आहे. यात पाच लघुपट एकत्रित आणण्यात आले आहेत.

‘अनपॉज्ड’ चित्रपट येत्या १८ डिसेंबरला प्रदर्शित झाला. यात ‘ग्लिच’, ‘अपार्टमेंट’, ‘रॅट-ए-टॅट’, ‘विषाणू’ आणि ‘चाँद मुबारक’ लघुपटांचा समावेश आहे. यातील ‘रॅट ए टॅट’ या लघुपटात रिंकू राजगुरूची भूमिका होती. याचं दिग्दर्शन लिलेट दुबेनं केलं असून रिंकूशिवाय तनिष्ठा चॅटर्जीदेखील यामध्ये मुख्य भूमिकेत दिसल्या.

लवकरच रिंकू छूमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचं चित्रीकरण लंडनमध्ये झालं असून सिनेमात प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय नागराज मंजुळे दिग्दर्शित अमिता बच्चन यांच्या झुंड सिनेमातही रिंकू दिसणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here