ईडीने आपल्याविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करावा अशी एकनाथ खडसे यांची मागणी आहे. इडीने बजावलेल्या समन्सला आपण पुन्हा हजर राहिलो आणि त्यावेळी जर इडीच्या अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना त्यांना हवे असल्याप्रमाणे उत्तरे दिली नाही तर अटकेची भीती आहे. म्हणूनच मी हायकोर्टात आलो, असे खडसे यांचे ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी हायकोर्टात युक्तिवाद करताना सांगितले.
आजचा युक्तिवाद अपूर्ण राहिल्याने मुंबई हायकोर्टाने आता पुढील सुनावणी २४ फेब्रुवारीला ठेवल्याने तोपर्यंत अटकेसारखी कठोर कारवाई करणार नसल्याची इडीची हमी कायम आहे.
पुणे तेथील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने एकनाथ खडसे यांना समन्स पाठवले होते.
क्लिक करा आणि वाचा-
पुणे तेथील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने एकनाथ खडसे यांना समन्स पाठवले होते. याबरोबर ईडीने खडसे यांना काही प्रश्नही विचारले होते. मात्र आपल्याला कोणतेही समन्स मिळालेले नसल्याचे खडसे यांनी त्यावेळी म्हटले होते.
क्लिक करा आणि वाचा-क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times