दौसा: राज्यसभेतील भाजपचे खासदार डॉ. किरोडी लाल मीणा ( ) यांनी दौसामध्ये सचिन पायलटविषयी ( ) मोठे विधान केले आहे. पायलट यांना भाजपमध्ये येण्याचे आवाहन केलं आहे. यांना पक्षात फक्त बाजूला करण्यात आलेलं नाही तर त्यांना पूर्णपणे खाली खेचण्यात आलं आहे. कॉंग्रेसमधील अंतर्गत कलह हा राज्यातील जनतेसाठी घातक आहे. अशा परिस्थितीत सचिन पायलट यांनी पक्षात घुसमट होत असेल तर त्यांनी भाजपमध्ये यावं. त्यांना मोकळीक दिली जाईल, असं खासदार किरोडीलाल मीणा म्हणाले.

‘पायलट ‘लंबी रेस के घोडे है’ आणि त्यांनी संयम राखला पाहिजे. त्यांनी संयमाने काम केलं तर बरेच काही मिळेल. पण त्यांनी धैर्य सोडले तर ते सर्व काही गमावतील. मुख्यमंत्री भवः म्हटल्याने कोणीही मुख्यमंत्री होऊ शकत नाही. यासाठी जनतेत जावं लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल, असं मीणा यांनी सांगितलं.

‘राज्याची टोपोग्राफी उलट-सुलट आहे, जातीय समीकरणं किचकट आहेत. अशा परिस्थितीत सचिन पायलट यांना आधी कठोर परिश्रम करावे लागतील, असं मीणा म्हणाले. राहुल गांधींच्या राजस्थान भेटीवरही ते बोलले. शेतकरी आंदोलन हे गैर राजकीय आहे. पण कॉंग्रेस आता त्यात उडी घेत आहे. शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून देशात काँग्रेसला अशांतता आणि अस्थिरता निर्माण करायची आहे. कॉंग्रेस कधीच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केलेला नाही. यामुळे शेतकऱ्यांचा कॉंग्रेसवर विश्वास राहिलेला नाही. यामुळे राहुल गांधींच्या सभांना गर्दी नसते, असं खासदार डॉक्टर किरोडी लाल मीणा म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here