म. टा. प्रतिनिधी, सांगली: सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून विना मास्क वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये बुधवारी दिवसभर ४८ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून ६२०० रुपये दंड वसूल करण्यात आला. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे व प्रभाग समिती १च्या सर्व स्वच्छता निरीक्षकांनी कारवाईत सहभाग घेतला.

सांगलीच्या राजवाडा चौकात वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, वैभव कुदळे, किशोर कांबळे, प्रणिल माने यांच्यासह प्रभाग समिती १ चे कर्मचारी यांनी विनामास्क वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली. यामध्ये ४८ व्यक्तीवर मास्क न वापरल्या बदल दंडात्मक कारवाई करत ६२०० इतका दंड वसूल केला.

वाचाः

कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सर्वानी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्स पाळावा आणि सॅनिटायझरचा वापर करा, असे आवाहन महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. मनपा क्षेत्रात मास्क न वापरणाऱ्या वाहनधारकांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू केली असून, ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे सहायक आयुक्त सहदेव कावडे यांनी सांगितले.

वाचाः

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here